'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने स्विमिंग पूलमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:30 IST2021-12-26T19:30:00+5:302021-12-26T19:30:00+5:30
Rupali ganguly: रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'अनुपमा'. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य भूमिका साकारत आहे.
अनुपमा या मालिकेमुळे चर्चेत आलेली रुपाली गांगुली सध्या तिच्या भूमिकेव्यतिरिक्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुपाली गांगुलीने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
रुपालीने स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिची बहीणदेखील असल्याचं पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे पडद्यावर कायम साध्या वेशात वावरणाऱ्या रुपालीचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते चांगलेच चक्रावून गेले आहेत. यापूर्वी रुपाचा असा अंदाज कोणीही पाहिलेला नाही.
रुपालीच्या या फोटोवर चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.