Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानचा पोलिसांसमोर धक्कादायक जबाब, म्हणाला- "तुनिषाने...",
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:32 IST2022-12-26T12:36:24+5:302022-12-26T13:32:27+5:30
टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिजानने चौकशीत धक्कादायक जबाब दिला आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. तुनिषा हिने तिच्या शो च्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणी रोज नवं खुलासे होतायेत. २४ डिसेंबरला अभिनेत्रीने ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul)च्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. (फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिजान खान (Sheezan Mohammad Khan) वर गंभीर आरोप केले आहेत.आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिजान विरोधात एफआयआर दाखल करत त्याला अटक केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
शिजान सध्या पोलिस कोठडीत असून आता त्याने तुनिशा आत्महत्या प्रकरणी धक्कादायक जबाब दिला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, आरोपी शिजान खान(Sheezan Khan)ने पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे की, काही दिवसांपूर्वीदेखील तुनिषा शर्माने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी शिजानने तिला थांबवलं होते. शीजानने याबाबत तुनिषाच्या आईलाही सांगितले होते. तसंच तिची विशेष काळजी घेण्यास ही सांगितलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
रिपोर्टनुसार आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषा काहीही खात नव्हती, असा जबाबही शिजानने पोलिसांना दिल्याचे बोलले जात आहे. ज्या दिवशी तुनिषाने आत्महत्या केली, त्याच दिवशी शिजानने तिला जेवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तिने खाण्यास नकार दिला.(फोटो इन्स्टाग्राम)
यानंतर तो तुनिषाला 'तू पण सेटवर चलं' असं म्हणत तिथून निघून गेला. त्यानंतर तुनिषाने त्याला सांगितले की, ती काही वेळाने येईल. त्यानंतर शिजान त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आणि तुनिषा परत आलीच नाही.(फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषा हिनं मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्या मेकअप रुममध्येच गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा आपण शूट करुन मेकअप रुममध्ये परतलो तेव्हा दरवाजा बंद होता आणि तो उघडत नव्हता. त्यामुळे दरवाजा तोडून आत जावं लागलं. आत तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं.(फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषा शर्मा एक गुणी टेलिव्हिजन अभिनेत्री होती. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कमी वयातच तुनिषानं या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती.(फोटो इन्स्टाग्राम)
तुनिषानं टेलिव्हिजन शोसोबतच चित्रपटातही काम केलं आहे. तुनिषा शर्मा टेलिव्हिजन शो 'अलिबाबा: दास्तान-ए-काबुल'मध्ये पाहायला मिळाली होती. तसंच तिनं 'फितूर' आणि 'बार बार देखो' या चित्रपटांमध्ये यंग कतरिना कैफची भूमिका साकारली होती.(फोटो इन्स्टाग्राम)