इतक्या वर्षांत सारा अली खानमध्ये झाला आहे इतका बदल, पाहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:45 IST2020-04-13T16:42:00+5:302020-04-13T16:45:02+5:30

सारा अली खान आता एकदम फिट दिसत असली तरी तिने या फिगरसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
सारा अली खानचे काही वर्षांपूर्वी वजन खूपच जास्त होते. ती नेहमीच तिचे जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
साराच्या जुन्या फोटोंवर तिचे फॅन्स नेहमीच भरभरून कमेंट करतात. सारा त्यावेळी देखील तितकीच क्यूट दिसायची असे ते तिला आवर्जून सांगतात.
सारा अली खानने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये तिची एक जागा निर्माण केली आहे.
सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे.
साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.
साराचा लव्ह आज कल २ हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
सारा अली खानच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची, स्टाईलची तिचे चाहते कौतुक करतात.