'हे बेबी' सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री डेब्यू सिनेमातून झाली होती स्टार, आता कुठे आहे गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:42 IST2025-11-21T17:37:58+5:302025-11-21T17:42:45+5:30

Aarti Chabria : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आरती छाब्रिया हिने आता सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला आहे. पहिल्याच चित्रपटातून तिचे नशीब फळफळले होते. ही अभिनेत्री आता कुठे गायब आहे, ते जाणून घ्या.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आरती छाब्रिया हिने आता सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला आहे. पहिल्याच चित्रपटातून तिचे नशीब फळफळले होते. ही अभिनेत्री आता कुठे गायब आहे, ते जाणून घ्या.

आरती छाब्रियाने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. पहिल्याच चित्रपटातून तिची लोकप्रियता खूप वाढली होती. काल, म्हणजेच २१ नोव्हेंबरला, ही अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करेल. यानिमित्ताने, इंडस्ट्रीपासून दूर असलेली आरती छाब्रिया आता काय करते, हे जाणून घेऊया.

आरती छाब्रिया २१ नोव्हेंबरला तिचा ४३वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिच्या डेब्यू चित्रपट 'लज्जा'मधून तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्याचबरोबर याच चित्रपटाने तिला प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय केले की ती रातोरात स्टार बनली.

आरती छाब्रियाने हिंदी सिनेसृष्टीत आपले खास स्थान तर निर्माण केलेच, पण त्याशिवाय जाहिरातींमध्येही आपल्या दिलखेचक अदांनी तिने सर्वांना वेड लावले. आता ही अभिनेत्री ४३ वर्षांची होईल. याच निमित्ताने आपण तिच्या करिअरवर एक नजर टाकणार आहोत.

'आवारा पागल दीवाना', 'शूटआउट ॲट लोखंडवाला', 'हे बेबी', 'पार्टनर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनय केला. सर्व चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी तिची खूप प्रशंसा केली होती. पण आता आरती छाब्रियाने चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला आहे. ती पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असते.

आपल्या नवीन पोस्ट्सच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांना तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे अपडेट्स देत राहते. याशिवाय, आरती छाब्रिया तिच्या वेगवेगळ्या आउटफिट्सने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांची मने जिंकते. इन्स्टाग्रामवर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते, जे आरतीच्या एका झलकसाठी उत्सुक असतात.

चित्रपटांव्यतिरिक्त तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीने ३०० हून अधिक ब्रँड्सचा चेहरा म्हणून त्यांची पब्लिसिटी केली आहे. याशिवाय तिने अनेक म्युझिक अल्बम्समध्येही काम केले आहे. इतके यशस्वी करिअर अर्धवट सोडून तिने शोबिज इंडस्ट्रीला अलविदा केला आणि आता ती आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत व्यतित करते आहे.

रिपोर्ट्सनुसार, या माजी अभिनेत्रीने २०१८ मध्ये टॅक्स कन्सल्टंट विशारद बीडासी सोबत गुपचूप लग्न केले आणि इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केले. आता ती पती आणि कुटुंबासोबत ॲास्ट्रेलियात राहते. तिने ४१ व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आणि आता हे जोडपे एकत्र त्यांच्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घेत आहे.

परंतु आरती छाब्रियासाठी आई होणे सोपे नव्हते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला गर्भपाताचे दुःखही सहन करावे लागले होते. त्यानंतर तिने तिची दुसरी प्रेग्नन्सी जगापासून लपवून ठेवली आणि अखेरीस ४१ व्या वर्षी ती आई झाली.

आता इंडस्ट्रीपासून दूर असलेली आरती प्रवास, आरोग्य आणि फॅशनचे व्हिडीओ बनवून चांगली कमाई करते आहे.