प्रेग्नंट होण्यासाठी या सहा अभिनेत्रींनी पाहिली नाही लग्नाची वाट, लिव्ह इनमध्येच दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 00:02 IST2022-05-18T23:59:10+5:302022-05-19T00:02:03+5:30

Bollywood Actress Pregnant In Live In Relationship: बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अनेकदा आपली फिगर मेन्टेन करण्यासाठी प्रेग्नंसीला उशीर करतात. मात्र अनेक अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाच्या आधी झालेल्या प्रेग्नंसीला आनंदाने एक्सेप्ट केलं आहे. जाणून घेऊयात अशाच काही अभिनेत्रींविषयी.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अनेकदा आपली फिगर मेन्टेन करण्यासाठी प्रेग्नंसीला उशीर करतात. मात्र अनेक अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाच्या आधी झालेल्या प्रेग्नंसीला आनंदाने एक्सेप्ट केलं आहे. जाणून घेऊयात अशाच काही अभिनेत्रींविषयी.

या यादीमध्ये सर्वात पहिला नंबर आहे तो हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा. हार्दिक पांड्या आणि नताशाने साखरपुड्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तसेच त्यांनी लग्नापूर्वी झालेल्या प्रेग्नंसीचा आनंदाने स्वीकार करत मुलगा अगस्त्या याला जन्म दिला.

अभिनेत्री कल्की कोचेलिन हिनेही विवाहाशिवाय आपल्या मुलाला जन्म दिला आहे. अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीने बॉयफ्रेंड गाय हर्षबर्ग याच्या मुलाला जन्म दिला.

अर्जुन रामपाल यालाही लग्नाआधीच गॅब्रिएला हिने वडील बनवले होते. अर्जुन रामपालच्या घटस्फोटाचा अर्ज फाईल झाला नव्हता. त्यामुळे त्याला गॅब्रिएलासोबत विवाह करता येत नव्हता.

दीया मिर्जाने तिच्या घटस्फोटाचे वृत्त देत सर्वांना धक्का दिला होता. दरम्यान, विवाहानंतर काही काळाने बेबी बम्प फ्लॉन्ट करत तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या अभिनेत्रीने लग्नापूर्वी प्रेग्नंसीबाबत अनेक मुलाखतींमधून उघडपणे मत मांडले होते.

या यादीमध्ये नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचाही समावेश आहे. नेहा धुपियाने झटपट आपलं लग्न उरकून घेतलं होतं. त्यानंतर तिने आपला बेबी बम्प फोटोशूट शेअर करत गुड न्यूज दिली होती.

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ हिने बॉयफ्रेंड यश दास गुप्ता याच्या मुलाला जन्म दिला. मात्र तिची सामाजिक परिस्थिती खूप वेगळी होती. नुसरतने व्यावसायिक निखिल जैन याच्यासोबत तुर्कीमध्ये विवाह केला होता. मात्र आता ती यशदास गुप्तासोबत फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे.