स्मिता पाटील यांची भाची, वयाच्या ५२ व्या वर्षीही एवढी फिट; शाहरुख खानसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:30 IST2025-11-07T12:20:32+5:302025-11-07T12:30:58+5:30

कोण आहे स्मिता पाटील यांची ही भाची? वयाच्या २७ व्या वर्षीच झालेली विधवा

सिनेसृष्टीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री स्मिता पाटील. त्यांचे वडील राजकारणात होते तर आई समाजकारणात होत्या. स्मिता पाटील यांनी मात्र अभिनयाचा मार्ग निवडला होता.

स्मिता पाटील यांची एक भाचीही सिनेसृष्टीत आहे. शाहरुख खानच्या सुपरहिट सिनेमात ती झळकली होती. तसंच वयाच्या ५२ व्या वर्षीही तिचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

ही अभिनेत्री आहे विद्या माळवदे. २००७ साली आलेल्या 'चक दे इंडिया' या लोकप्रिय सिनेमात विद्याची भूमिका होती. तसंच तिने 'मिसमॅच्ड' या सीरिजमध्येही काम केलं.

विद्याचे वडील मोहन माळवदे हे स्मिता पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. यामुळे विद्या आणि प्रतीक बब्बर हेही नात्याने चुलत भाऊ बहीण आहेत.

१९९७ साली विद्याने वयाच्या २४ व्या वर्षी कॅप्टन अरविंद बग्गा यांच्याशी लग्न केलं. परंतु लग्नाच्या तीन वर्षातच विमान अपघातात अरविंद यांचं निधन झालं.

पतीच्या निधनानंतर विद्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला. तिचं करिअरही मागे पडलं. काही वर्षांनी २००९ साली विद्याने संजय दायमा यांच्याशी दुसरं लग्न केलं.

विद्या ५२ वर्षांची असली तरी अगदी तिशीतलीच दिसते. नियमित योग, योग्य आहार हे तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.