बहिणीच्या निर्णयामुळे करिअर बर्बाद, लग्न मोडल्यानंतर गेली डिप्रेशनमध्ये, प्रसिद्ध अभिनेत्री आता करते असं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:38 IST2023-12-28T14:25:58+5:302023-12-28T14:38:00+5:30

Smilie Suri: स्मायली सुरी हिने कुणाल खेमूसोबत कलयूग चित्रपटामधून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. मात्र ही अभिनेत्री टाइपकास्टची शिकार झाली. या चित्रपटानंतर तिला ज्या भूमिका ऑफर झाल्या त्या तिच्या आधीच्या भूमिकांशी मिळत्याजुळत्या होत्या.

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलयुग चित्रपटामधील क्युट आणि सुंदर अभिनेत्री स्मायली सुरी तुम्हाला आठवतेय का? या चित्रपटामध्ये स्मायली कुणाल खेमूसोबत दिसली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी यांची बहीण असूनही स्मायलीची अभिनयातील कारकीर्द अल्पकालीन राहिली. तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली. मात्र तिने अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं. प्रोफेशनल लाईफप्रमाणेच स्मायलीची पर्सनल लाईफही अनेक चढउतारांनी भरलेली आहे. करिअर अल्पकालीन ठरल्यानंतर तिचं लग्नही मोडलं. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. मात्र या सगळ्यातून ती सावरली. पुन्हा उभी राहिली. तसेच आता ती आनंदी जीवन जगत आहे.

स्मायली बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबाशी संबंधित आहे. ती महेश भट्ट यांची भाची आहे. या नात्याने ती पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्यासोबत इम्रान हाश्मी याचीही बहीण लागते. तिची वहिनी उदिता गोस्वामी ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार स्मायली सुरी हिला आधी तिची बहीण पूजा भट्ट तिच्या हॉलीडे चित्रपटामधून लॉन्च करणार होती. या चित्रपटात स्मायली ही डिनो मोरियासोबत दिसणार होती. चित्रपटाचं चित्रिकरणही सुरू झालं होतं. मात्र त्या भूमिकेसाठी पूजा भट्ट हिला स्मायली ही योग्य वाटली नाही.

काही दिवस हॉलीडेचं चित्रिकरण केल्यानंतर पूजा हिने अचानक स्मायलीला या चित्रपटामधून बाहेरची वाट दाखवली. त्यामुळे स्मायलीला धक्का बसला. ती दु:खी झाली. चित्रपटामधून बाहेर काढण्यात आल्याने इंडस्ट्रीमध्ये तिच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

या चित्रपटातून बाहेर झाल्यानंतर स्मायलीला तिचा भाऊ मोहित सुरी याने लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मायलीने कलयुग चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटानंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. त्यानंतर तिने ३-४ चित्रपटात काम केलं. त्यानंतर अचानक ती इंडस्ट्रीमधून गायब झाली.

दरम्यान, स्मायलीने सालसा डान्स शिकायला सुरुवात केली. इथे तिची भेट डान्स टिचर विनीतसोबत झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेट केल्यानंतर त्यांनी लग्नही केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये स्मायलीने घटस्फोट घेतला.

घटस्फोटामुळे स्मायली डिप्रेशनची शिकार होऊ लागली. प्रोफेशनल लाइफनंतर तिची पर्सनल लाइफही उद्ध्वस्त झाली होती. अशा परिस्थितीत स्वत:चं मन गुंतवण्यासाठी स्मायलीनं डान्सची मदत घेतली.

आता स्मायली पोल डान्स करते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ येत असतात. त्यात ती पोल डान्स करताना दिसून येते. स्मायली आता मुंबईत एक डान्स स्टुडिओही चालवते. त्याचं नाव पोल्स स्टार इंडिया, असं आहे.