IN PICS : ‘श्रीवल्ली’चा हटके टॅटू, रश्मिका मंदानाच्या हातावरच्या टॅटूचा अर्थ माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 17:10 IST2022-09-25T17:03:09+5:302022-09-25T17:10:52+5:30
Rashmika Mandanna : होय, सध्या चर्चा आहे ती रश्मिकाच्या टॅटूची. रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना दिसतेय...

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. तिचा ‘गुडबाय’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतेय. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखीही एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगलीये.
होय, सध्या चर्चा आहे ती रश्मिकाच्या टॅटूची. रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना दिसतेय. रश्मिकाच्या उजव्या हातावर मनगटाच्या खाली एक टॅटू गोंदवला आहे.
यात तिने एक इंग्रजी शब्द हातावर कोरलेला दिसतोय. रश्मिकाच्या अनेक फोटोत तिचा हा टॅटू दिसतो. अनेक कार्यक्रमात ती हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.
रश्मिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणीत हा टॅटू बनवल्याचं अनेकांचं मत आहे. पण असं अजिबात नाहीये. रश्मिकाने Irreplaceable लिहिलेलं आहे. आता त्याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर लाईव्ह सेशनदरम्यान् एका चाहत्याने रश्मिकाला नेमका हाच प्रश्न केला होता. तुझ्या हातावरील टॅटूचा अर्थ सांग, अशी विनंती या चाहत्याने केली होती. त्यावेळी रश्मिकाने या टॅटूचा अर्थ सांगितला होता.
ती म्हणाली होती, मी माझ्या हातावर Irreplaceable असा इंग्रजी शब्द लिहिला आहे. याचा अर्थ होतो स्थिर. असं काही जे कधीच बदलता येत नाही. मी Irreplaceable आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळा आहे, अद्वितीय आहे. तुम्हाला कोणतीही अन्य व्यक्ती रिप्लेस करू शकत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिकाने हा टॅटू कॉलेजमध्ये असताना बनवला होता. या टॅटूचा रश्मिकाच्या लव्ह लाईफशी काहीही संबंध नाही. तो तिने स्वत:साठी, स्वत:ला डेडिकेट केलेला टॅटू होता.
रश्मिकाच्या ‘गुडबाय’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर, याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या 7 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
बॉलिवूडमध्ये रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबतही दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात रश्मिका व सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी ऑनस्क्रीन रोमान्स करताना झळकणार आहे.