Pooja Sawant ने गुपचूप उरकला साखरपुडा?, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:10 IST2023-07-25T19:06:13+5:302023-07-25T19:10:10+5:30

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सांवत मागील काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री पूजा सांवत मागील काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अभिनेत्रीने या चर्चेवर मौन सोडत खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्रावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत पूजा नेहमीप्रमाणे खुपच सुंदर दिसते आहे.

या फोटोत पूजाच्या हातात एक रिंग दिसली. त्यानंतर तिने एंगेजमेंट केल्याच्या चर्चांना उधाण आले. अखेर तिने यावर प्रतिक्रिया दिली.

एका मुलाखतीत पूजाने या वृत्तावर मौन सोडले. ती म्हणाली की, असं काही नाही. तिने अंगठी उजव्या हातात घातली आहे.

तिचा साखरपुडा झालेला नाही. तिला देखील हे वृत्त खूप उशिरा कळले.

इतकंच नाही तर पूजा म्हणते की, साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवे..

यावरुन पूजा सावंत अद्याप सिंगल असून ही निव्वळ अफवा आहे.

पूजा सावंत लवकरच मुसाफिरा चित्रपटात झळकणार आहे.