Nora Fatehi : "मी त्याच्या कानाखाली मारली", सेटवर को-स्टारशी भिडली नोरा फतेही, जोरदार भांडण अन् मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:08 IST2025-02-26T18:43:20+5:302025-02-26T19:08:29+5:30

Nora Fatehi : एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीचं को-स्टारसोबत मोठं भांडण झालं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्स मूव्हजने चाहत्यांना वेड लावते. एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीचं को-स्टारसोबत मोठं भांडण झालं होतं.

स्वतः नोरा फतेहीनेच याबाबत सांगितलं आहे. जेव्हा अभिनेत्री कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली. त्यावेळी तिने या घटनेचा उल्लेख केला होता.

नोराने म्हटलं की, 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटाचं ती शूटिंग करत होती. तेव्हा तिचं तिच्या को-स्टारशी मोठं भांडण झालं. याच दरम्यान तिने अभिनेत्याला जोरदार कानाखाली मारली.

तो अभिनेता नोराशी खूप गैरवर्तन करत होता. तिलाही या गोष्टीचा खूप राग आला होता. त्यामुळे ती प्रचंड संतापली आणि तिने त्याला कानाखाली मारली.

नोराने सांगितलं की, "यानंतर तो को-स्टारही गप्प बसला नाही, त्याने मलाही कानाखाली मारली."

"आम्ही दोघेही एकमेकांचे केस पकडून भांडू लागलो. हा ड्रामा सेटवर बराच काळ चालू राहिला."

नोरा आयुष्मान खुरानासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये 'एन एक्शन हिरो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. तिचे बोलणं ऐकून सर्वजण जोरजोरात हसायला लागले.

नोरा फतेहीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

अभिनयाव्यतिरिक्त ही अभिनेत्री अनेकदा डान्स रिअॅलिटी शो जज करताना दिसते. तिचे असंख्य चाहते आहेत.