'कारभारी लयभारी'फेम अभिनेत्रीला मिळाला रिअल लाइफ कारभारी; थाटात पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:43 IST2023-04-26T18:35:32+5:302023-04-26T18:43:27+5:30
Rashmi patil: रश्मीने तिच्या इन्स्टाग्रामवर या साखरपुड्याचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे कारभारी लयभारी. ही मालिका संपून बरेच दिवस झाले. मात्र, त्यातील कलाकारांची कायम चर्चा रंगत असते.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील रश्मी पाटील हिची चर्चा रंगली आहे. कारभारी लयभारी या मालिकेत शोना मॅडमची भूमिका साकारुन रश्मी चर्चेत आली.
या मालिकेनंतर रश्मी फारशी कोणत्या मालिकांमध्ये दिसली नाही. मात्र, सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
रश्मीचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने या साखरपुडा समारंभाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रश्मीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय असं आहे. अक्षयसोबत रश्मीने बरेच रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.
रश्मीने मालिकांसह सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
इंद्रभुवन या सिनेमात रश्मी झळकली आहे. तर, एक गाव बारा भानगडी या सीरिजमध्येही ती दिसली होती.
रश्मीने तिच्या साखरपुड्यासाठी खास अंगठी डिझाइन केली होती.
रश्मी आणि तिच्या नवऱ्याचा रोमॅण्टिक फोटो