"पाहताना तुला चंद्रही लाजला..." नम्रता प्रधानचा मनमोहक अंदाज; फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:59 IST2024-11-07T15:45:58+5:302024-11-07T15:59:03+5:30
'छत्रीवाली','ठिपक्यांची रांगोळी' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री नम्रता प्रधानने छोटा पडदा गाजवला.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत तिने साकारलेलं सुमी नावाचं पात्र प्रेक्षकांना भावलं.
नम्रता प्रधान मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.
"Shine like the diamond you are..." असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत.
अभिनेत्रीचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.