साज ह्यो तुझा...! गुलाबी साडीत खुललं जुई गडकरीचं सौंदर्य, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:01 IST2025-02-10T15:48:56+5:302025-02-10T16:01:24+5:30
'पुढचं पाऊल' या मालिकेत 'कल्याणी'ची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
जुई सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत आहे.
जुई नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
त्यामाध्यमातून ती चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट शेअर करत असते.
सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन-प्रियाच्या लग्नाचा सीक्वेंस चालू आहे. तर दुसरीकडे सायली पुन्हा एकदा आपलं अर्जुनसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे.
परंतु याव्यतिरिक्त सध्या अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
जुईने या फोटोशूटसाठी गुलाबी साडी नेसली आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र तसेच हातात हिरव्या बांगड्या आणि केसात पिवळ्या गुलाबाची फुले तिने माळली आहेत.
अभिनेत्रीचं हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.