केसात गजरा अन् खिळल्या साऱ्यांच्या नजरा; सायली संजीवचं मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:17 IST2025-01-12T17:10:06+5:302025-01-12T17:17:42+5:30

सायली संजीवचा दिलखेचक अंदाज, पाहा खास फोटो.

सायली संजीव ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करुन तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.

सायली सोशल मीडियावर अनेक फोटो,व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

केसात गजरा, मोत्याचे कानातले तसेच साडी परिधान करुन तिने खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री सायली संजीव फारच सुंदर दिसते आहे.