फुलांमागे लपलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? गाजवतेय मराठी सिनेइंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:34 IST2025-05-14T17:22:07+5:302025-05-14T17:34:01+5:30

फुलांमागे लपलेली ही अभिनेत्री कोण? तुम्ही ओळखलंच नसेल

सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललं आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीदेखील यावर आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोची चर्चा रंगली आहे. अनेकजण तिला ओळखूच शकले नाहीत. ही अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे आहे.

गौरी नलावडे हे मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेलं नाव आहे.

'स्वप्नांच्या पलिकडले', 'सूर राहू दे' या मालिकांमधून गौरी घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या.'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करून तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.

गौरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

नुकतंच तिने हटके अंदाजात फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हातात फुलं घेऊन उभी ती चेहऱ्यासमोर धरुन अभिनेत्रीने हे फोटो क्लिक केले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत."तुमची प्रेमाची भाषा काय आहे... ", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.