सिल्कच्या वनपीस गाऊनमध्ये प्रार्थनाचं नवं फोटोशूट; न्यूड मेकअपमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:40 IST2022-07-05T19:40:00+5:302022-07-05T19:40:00+5:30
Prarthana behere: प्रार्थना कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये झळकलेल्या प्रार्थनाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.
प्रार्थना दररोज 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
प्रार्थना कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच प्रार्थनाने सिल्कच्या वनपीस गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.
प्रार्थनाच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने न्यूड मेकअप केला आहे.
बऱ्याचदा पारंपरिक आऊटफिटमध्ये फोटो शेअर करणाऱ्या प्रार्थनाचे हे फोटोदेखील तितकेच सुंदर आहेत.
प्रार्थना कायम वेगवेगळे प्रयोग करुन फोटोशूट करत असते.