निर्मिती सावंतच्या सूनबाईंना पाहिलंय का? brain with beauty असलेली सून आहे एका कंपनीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 07:00 IST2022-06-09T07:00:00+5:302022-06-09T07:00:01+5:30

Nirmiti Sawant:पूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं.

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.

कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत येत असतात.

निर्मिती सावंत लवकरच किचन कल्लाकार या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा होतांना दिसते. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांच्या सूनबाईंचीदेखील चर्चा रंगली आहे.

फू बाई फू, जाडूबाई जोरात या मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यांची सूनदेखील एक उत्तम कलाकार आहे.

निर्मिती सावंत यांच्या लेकाने अभिनय सावंतने पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्न केलं आहे.

अभिनय आपल्या आईप्रमाणेच एक उत्तम अभिनेता आहे. तर, पूर्वा एक डुडल आर्टिस्ट आहे.

पूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

पूर्वाची स्वत:ची एक डुडल कंपनी आहे. त्यामुळे ती स्वत: तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते.

पूर्वाने सासूबाई निर्मिती सावंत यांच्यासोबतही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.