खंडणी प्रकरणात अडकलेली हेमलता बाणे आहे तरी कोण? 'या' अभिनेत्यांसोबत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:04 IST2025-12-30T15:51:11+5:302025-12-30T16:04:04+5:30
हेमलता बाणेबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

मराठी मनोरंजनविश्वात एक बातमी काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका मराठी अभिनेत्रीला खंडणीप्रकरणात अटक झाली आहे.

हेमलता बाणे असं अभिनेत्रीचं नाव आहे. एका बिल्डरकडून खंडणी वसूल करताना तिला आणि आणखी एका महिलेला पोलिसांनी पकडलं.

हेमलता बाणेने आदित्य पाटकरसोबत काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत दिसलेल्या अर्चना पाटकर यांची ती सून होती.

मात्र अर्चना पाटकर यांनी नुकतंच हेमलताचा आमच्याशी काहीही संबंध नाही. माझा मुलगा तिच्यापासून विभक्त झाला असून ४ वर्षांपासून त्यांच्या घटस्फोटाची केस सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेमलता बाणे बऱ्याच वर्षांपूर्वी 'लावू का लाथ' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. यात ती सुरेखा या लावी डान्सरच्या भूमिकेत होती. यामध्ये तिच्यासोबत विजय पाटकर दिसले होते.

तसंच २०१३ साली आलेल्या अशोक सराफ यांच्या 'खरं सांगू खोटं खोटं' या सिनेमातही ती दिसली. यानंतर पुष्कर श्रोत्री, सागर कारंडे यांच्या 'कॅरी ऑन देशपांडे' सिनेमातही तिने काम केलं.

हेमलता लावणी डान्सर आहे. ती उत्तम डान्सर करते. एकापेक्षा एक कार्यक्रमातही ती दिसली होती. मात्र काही वर्षांनी हेमलता एकाएकी सिनेसृष्टीतून गायबच झाली.

हेमलता बाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्रामवर रील्स शेअर करते. डिजीटल क्रिएटर असं तिने आता बायोमध्ये लिहिलं आहे. दरम्यान खंडणी प्रकरणात अटक झाल्याने ती प्रसिद्धीझोतात आली आहे.

















