निसर्गाच्या सानिध्यात अश्विनी कासारचं मनमोहक फोटोशूट; पाहा अभिनेत्रीचे काही निवडक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:27 IST2022-08-01T17:22:30+5:302022-08-01T17:27:05+5:30
Ashwini kasar:कमला, कट्टीबट्टी, मोलकरीण बाई – मोठी तिची सावली, गर्जा महाराष्ट्र एपिसोडिक शो, सावित्री ज्योती या मालिकांमध्येही तिने काम करत लोकप्रियता मिळवली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. कलाविश्वाप्रमाणेच अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अश्विनी इन्स्टाग्रावर कायम तिचे नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. असाच असंच एक नवं फोटोशूट तिने केलं असून त्यातील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अश्विनीने साडी नेसून निसर्गच्या सानिध्यात फोटोशूट केलं आहे.
२०१४ मध्ये कमला या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सर,लेखिका आहे.
अश्विनीने सोयरे सकळ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसंच एक होती माळीण या चित्रपटातही तिने काम केलं आहे.
अश्विनीने अलिकडेच निसर्गाच्या सानिध्यात छानसं फोटोशूट केलं आहे.
अश्विनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये अश्विनी अत्यंत साध्या पण तितक्याच मनमोहक लूकमध्ये पाहायला मिळते.