'युवराज'ची रिअल लाइफ पार्टनरही आहे अभिनेत्री; 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'मालिकेत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:29 IST2022-03-10T14:25:10+5:302022-03-10T14:29:27+5:30
Vijay andalkar: रुपालीपूर्वी विजयने अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पूजा अलिकडेच 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत कामिनी ही भूमिका साकारताना दिसली होती.

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे पिंकीचा विजय असो. ही मालिका सुरु झाल्यापासून चर्चेत आहे.
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे हिने पिंकीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता विजय आंदळकर युवराज या भूमिकेत दिसून येत आहे.
या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिंधास्तपणा प्रेक्षकांना खासकरुन आवडत आहे.
त्यामुळेच विजयच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.
अनेकदा सोशल मीडियावर विजयच्या पत्नीची चर्चा होते. त्याची पत्नी काय करते, कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.
विजयच्या पत्नीचं नाव रुपाली झनकर असं असून तीदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत रुपाली झळकली होती.
मालिकेचं चित्रीकरण सुरु असतानाच विजय आणि रुपाली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.
रुपाली मुळची नाशिकची आहे.
रुपालीपूर्वी विजयने अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पूजा पुरंदरे अलिकडेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत कामिनी ही भूमिका साकारताना दिसली होती.
विजय वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपटांमध्ये झळकला आहे.