'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्री वैशाली राजेघाटगेचा रॉयल लूक चर्चेत, दिसल्या खूपच सुंदर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:08 IST2022-09-20T19:02:50+5:302022-09-20T19:08:51+5:30
Man Jhala Bajind fame Vaishali Rajeghatge : 'मन झालं बाजिंद' मालिकेत अभिनेत्री वैशाली राजेघाटगे यांनी रायाच्या आईची भूमिका साकारली होती.

झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत राया, कृष्णा, फुई आज्जी, गुली, भाऊसाहेब विधाते, आशा मामी , मुंजा, सोपान मामा यासर्वच पात्रांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
'मन झालं बाजिंद' मालिकेत अभिनेत्री वैशाली राजेघाटगे यांनी रायाच्या आईची भूमिका साकारली होती.
वैशाली राजेघाटगे मुळच्या साताऱ्याच्या असून त्यांनी भरतनाट्यमचे धडे गिरविले आहेत. कोरियोग्राफर म्हणून त्यांनी कलाक्षेत्रात काम केले आहे. भरतनाट्यममध्ये एम ए आणि अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीवर त्या सक्रिय असून नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांचा हातखंडा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या दिग्दर्शिका असा मान त्यांनी पटकावला आहे.
अभिनय, नृत्य दिग्दर्शन, निर्माती अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपले नशीब आजमावले आहे.
वैशाली राजेघाटगे यांनी नुकतेच रॉयल लूकमध्ये फोटोशूट केले आहे आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वैशाली राजेघाटगे या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या रॉयल अंदाजातील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.
सातारामध्ये त्यांची नृत्य अकॅडमी आहे. जिथे अनेक मुलामुलींना नृत्याचे धडे दिले जातात. वैशाली राजेघाटगे यांच्या कलाधाम ग्रुपने थायलंड बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेत फायनलमध्ये गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल आणि वैशाली राजेघाटगे यांनी बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड मिळवून सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.