हर हर महादेव...! महाशिवरात्रीनिमित्त दिशा परदेशीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:09 IST2025-02-26T17:57:38+5:302025-02-26T18:09:46+5:30

अभिनेत्री दिशा परदेशी महादेवाच्या भक्तीत तल्लीन, शेअर केले फोटो.

अभिनेत्री दिशा परदेशी हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

अलिकडेच अभिनेत्री झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. परंतु काही कारणास्तव तिने या मालिकेतून एक्झिट घेतली.

दरम्यान, आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिशाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दिशा पोहोचली आहे.

त्याठिकाणी जाऊन अभिनेत्री महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याची पाहायला मिळली. याशिवाय तिने महादेवाची मनोभावे पूजा केली आहे.

'हर हर महादेव...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.