शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:25 IST2024-01-29T16:10:51+5:302024-01-29T16:25:21+5:30
शिवाली परबच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण पात्रं साकारून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत आहे.
तिच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील चाहते आहेत. सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे.
नुकतंच शिवालीने खास फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये शिवालीने पांढऱ्या रंगाची स्टायलिश कुर्ती परिधान केला आहे. तर यावर हटके आणि सुंदर लुकसाठी तिने लाल रंगाची बांधणी ओढणी घेतली.
शिवालीने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
'चांदणी वर चंद्रकोर शोभते बरं का', 'अप्रतिम' आणि 'अतिसुंदर' अशा कमेंट केल्या आहेत.
'छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणारी शिवाली रीयल लाईफमध्येही बिनधास्त आहे.
छोट्या पडद्यावरुन तीने मोठ्या पडद्यावरही एन्ट्री केली आहे. शिवालीला अभिनयाबरोबर नृत्याचीही आवड आहे.