‘माझा होशील ना’फेम सुनील तावडेंचा लेक आहे प्रसिद्ध अभिनेता; 'वेड' सिनेमात साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:34 IST2023-06-14T19:28:50+5:302023-06-14T19:34:58+5:30
Sunil tawde son:सुनील तावडे यांचा लेकदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुनील तावडे. कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारुन सुनील तावडे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
मध्यंतरी आलेल्या माझा होशील ना या मालिकेत सुनील तावडे यांनी बंधू मामा ही भूमिका साकारली होती.
सुनील तावडे गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या फिल्मी प्रवासाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.
सध्या सोशल मीडियावर सुनील तावडे यांच्या लेकाची चर्चा रंगली आहे.
सुनील तावडे यांचा लेकदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
सुनील तावडे यांच्या लेकाचं नाव शुभंकर तावडे असं असून त्याने ‘डबल सीट’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली.
शुभंकर ‘कागर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला आहे. तसंच त्याने ‘काळे धंदे’ या वेब सिरीज मध्येही काम केलं आहे.
शुभंकर अलिकडेच रितेश देशमुखच्या वेड सिनेमातही झळकला होता.