'या' बेकायदेशीर कामामुळे थांबवलं होतं ज्यूनिअर एनटीआरचं लग्न, मुख्यमंत्री होते त्याचे आजोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 14:10 IST2021-12-10T13:55:52+5:302021-12-10T14:10:26+5:30

Jr. NTR : ज्यूनिअर एनटीआर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामा राव यांचा नातू आहे. तो इंडस्ट्रीमध्ये तारक नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांची मनं जिंकणारा ज्यूनिअर एनटीआरची तरूणाईत मोठी क्रेझ आहे.

आपल्या सिनेमांमध्ये धमाकेदार अॅक्शनसाठी प्रसिद्ध ज्यूनिअर एनटीआर सध्या त्याच्या आगामी RRR सिनेमासाठी चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. बाहुबली फेम एस. एस. राजमौली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमांसोबतच ज्यूनिअर एनटीआर आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. चला जाणून त्याच्या लग्नाचा चर्चेबाबत....

तारक आणि ज्यूनिअर एनटीआर नावांनी पसंत केला जाणाऱ्या या अभिनेत्याचं पूर्ण नाव नंदमुरी तारक रामा राव असं आहे. तो साऊथ इंडस्ट्रीत टॉपच्या अभिनेत्यांपैकी आहे. अभिनेत्याने 'स्टूडेंट नं 1', 'राखी', 'सिम्हाद्री', 'टेंपर', 'प्रेमाथो', 'जनता गैराज' आणि 'बादशाह' सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ज्यामुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

ज्यूनिअर एनटीआर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामा राव यांचा नातू आहे. तो इंडस्ट्रीमध्ये तारक नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांची मनं जिंकणारा ज्यूनिअर एनटीआरची तरूणाईत मोठी क्रेझ आहे.

आपल्या अॅक्शनने फॅन्सचं मन जिंकतो आणि आपल्या गुड लूक्सने तो तरूणींच्या मनात घर करतो. केवळ साऊथमधीलच नाही तर देभरात त्याचे फॅन्स आहेत. ज्यूनिअर एनटीआरचे सिनेमे सुपरहिट होतात. त्याच्या सिनेमांसाठी त्याला नंदी अवॉर्ड, आईफा अवॉर्ड, फिल्मफेयर बेस्ट तेलुगु अवॉर्डही मिळाला आहे.

नंदमुरी तारक रामा राव उर्फ ज्यूनिअर एनटीआरने १९९१ मध्ये रिलीज झालेल्या 'ब्रम्हार्षि विश्वमित्र'मधून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. या सिनेमाचं दिग्दर्शन त्या काळातील पॉप्युलर दिग्दर्शक आणि त्याचे आजोबा एनटीआरने केलं होतं. त्यानंतर तो १९९६ मध्ये रामायण सिनेमात दिसला होता.

ज्यूनिअर एटीआर हिरो म्हणून २००४ साली रिलीज झालेल्या तेलुगू सिनेमातून समोर आला. हा सिनेमा त्या सालातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होता. त्यानंतर त्याने एकापाठी एक सुपरहिट सिनेमे दिले. २०१३ मध्ये बादशाह सिनेमात दिसला होता. हा सिनेमा खूप जास्त गाजला होता.

ज्यूनिअर एनटीआरने २०११ मध्ये तेलुगू चॅनलचे मालक नर्ने श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न केलं होतं. ज्यावेळी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी प्रणति केवळ १७ वर्षांची होती. लग्नाची बातमी समोर आल्यावर विजयवाडा येथील वकील सिंगुलुरी शांति प्रसाद यांनी अभिनेत्या विरोधात चाइल्ड मॅरेज अॅक्टनुसार तक्रार दाखल केली होती. वादातून वाचण्यासाठी अभिनेत्याने प्रणतिचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली होती आणि ५ मे २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. दोघांना आता दोन मुलं आहेत.