'इश्कबाज'फेम अभिनेत्रीने बांधली मराठमोळ्या तरुणाशी लग्नगाठ; पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडला लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:09 IST2023-12-22T11:58:42+5:302023-12-22T12:09:47+5:30
Shrenu parikh: जाणून घ्या, कोण आहे श्रिनूसोबत लग्न करणारा मराठी तरुण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेनू पारीख. टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आज ती ओळखली जाते.
'इस प्यार को क्या नाम दू', 'इश्कबाज' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
अनेकांची क्रश असलेल्या श्रिनूने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. २१ डिसेंबर २०२३ रोजी मराठमोळ्या पद्धतीने श्रिनूने लग्न केलं.
श्रिनूने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही निवड फोटो पोस्ट केले आहेत. यात लग्नातील प्रत्येक फंक्शनपासून ते सप्तपदीपर्यंतच्या फोटोंचा समावेश आहे.
श्रिनूने मराठमोळ्या तरुणाशी लग्न केलं आहे. त्यामुळे या अभिनेत्रीने नेमकं कोणत्या युवकाशी लग्न केलं. तो काय करतो अशा कितीतरी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगल्या आहेत.
श्रिनू पारीखने अक्षय म्हात्रे याच्यासोबत लग्न केलं आहे.'टेकन फॉरेव्हर' असं म्हणत तिने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
श्रिनूने या लग्नसोहळ्यात मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला होता. नऊवारी साडी, नाकात नथ असा छान गेटअप तिने केला होता.
श्रिनू आणि अक्षय यांचा लग्नातील रोमॅण्टिक फोटो
श्रिनूच्या लग्नाचं रिसेप्शनही चांगलंच चर्चेत राहिलं. या लग्नासाठी त्यांनी खास जागेची निवड केली होती.
या लग्नसोहळ्यात खास पद्धतीचं डेकोरेशन करण्यात आलं होतं.