IN PICS : सामंथा रूथ प्रभूच्या हाती दिसलं पुस्तक; लोकांनी काढला भलताच अर्थ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:20 IST2022-08-04T17:14:44+5:302022-08-04T17:20:50+5:30

Samantha Ruth Prabhu : साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू सध्याची सर्वात चर्चित अभिनेत्री आहे. या ना त्या कारणाने सामंथा चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या एअरपोर्टवरच्या फोटोंनी वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे.

साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू सध्याची सर्वात चर्चित अभिनेत्री आहे. या ना त्या कारणाने सामंथा चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या एअरपोर्टवरच्या फोटोंनी वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे.

द फॅमिली मॅन आणि पुष्पा या चित्रपटातील आयटम सॉन्गच्या बम्पर यशानंतर सामंथा रूथ प्रभु आपल्या पॅन इंडिया प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.

या प्रोजेक्टमुळे हैदराबाद ते मुंबई अशा तिच्या वाऱ्या सुरू आहेत. काल सामंथा मुंबई एअरपोर्टवर दिसली आणि एअरपोर्टवरचे तिचे फोटो क्षणात व्हायरल झालेत.

खास म्हणजे, हे फोटो पाहून अनेकांनी वेगळाच तर्क काढला. काय तर सामंथा डिप्रेशनमध्ये आहे. होय,सामंथा डिप्रेशनमध्ये आहे, असं लोक बोलायला लागले.

एअरपोर्टमधून बाहेर पडताना सामंथाच्या हातात एक पुस्तक दिसलं. ‘यू कॅन हील युवर लाईफ’ असं पुस्तकाचं नाव बघून लोकांनी हा अंदाज बांधला.

सामंथा डिप्रेशनमध्ये आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सेल्फ हेल्प बुक वाचतेय, असा तर्क अनेकांनी काढला. काहींनी तर सामंथाबद्दल चिंता व्यक्त केली.

नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अद्यापही सावरू शकलेली नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे आणि सामंथाच्या हातातील पुस्तकाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यांत सामंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती.