पाहिले न मी तुला मालिकेत भूमिका साकारणारी तन्वी मुंडलेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 11:52 IST2021-06-09T11:44:56+5:302021-06-09T11:52:07+5:30

'पाहिले न मी तुला' हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि या मालिकेतील मनू म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले हिचा नवा चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

तन्वीने युथ फेस्टिवल्स पासून अभिनयाला सुरुवात केली.

मागील ६ वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करतेय.

मागील ६ वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करतेय.

तन्वी मूळची सिंधुदुर्गमधील कुडाळची असून, ग्रॅज्युएशन कुडाळमध्ये तर मास्टर्स पुण्यात केलं आहे.

कोकणात बाबा वर्दम थिएटरच्या माध्यमातून नाटकात अभिनयाची कारकीर्द सुरु केली.

कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची.

ललित कला केंद्रामध्ये नाट्यशास्त्रात तन्वीने मास्टर्स केलं आहे.

मागच्या वर्षी पास झाले आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कलरफुल' या चित्रपटात संधी मिळाली.

त्यानंतर लगेचच 'पाहिले न मी तुला' या मालिकेची ऑफर तिला मिळाली.

ऑडिशन देत असताना झी मराठीवरील मालिका करायला मिळेल असं तन्वीला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

प्रोमो शूट होऊन ऑन-एअर गेला तरीही यावर विश्वास बसत नव्हता असे तन्वी सांगते.