Photos: 'इंडियन आयडॉल'फेम सायली कांबळेचं घर पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:40 IST2022-01-31T18:40:00+5:302022-01-31T18:40:00+5:30

Indian idol: अलिकडेच सायलीने नवीन घर घेतलं असून तिच्या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल. आतापर्यंत या शोचे अनेक पर्व पार पडले आहेत.

अलिकडेच या शोचं १२ वं पर्व पार पडलं. यंदाच्या पर्वात पवनदीप राजन विजेता ठरला.तर मराठमोळी सायली सेकंड रनरअप ठरली.

मराठमोळ्या सायलीने इंडियन आयडॉलचं पर्व तर गाजवलंच पण तिच्या सौंदर्याने अनेक तरुणांच्या मनावर भुरळ पाडली.

सायली सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचेही फोटो शेअर करत असते.

अलिकडेच सायलीने नवीन घर घेतलं असून तिच्या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सायलीच्या घरातील तिने शेअर केलेला फोटो

घरात गृहप्रवेश करतांना सायलीचे आई-वडील.