कोण आहे पंजाबची ऐश्वर्या? 'बिग बॉस'मध्ये गाजलं अफेअर; तिला पाहून सलमान खान म्हणालेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:52 IST2025-11-27T12:21:33+5:302025-11-27T12:52:39+5:30
शहनाज गिल पंजाबची कतरिना, तर ऐश्वर्या आहे 'ही' अभिनेत्री

सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हटलं तर ऐश्वर्या रायचं नाव येतंच. तिचे डोळे, चेहऱ्यावरचं तेज पाहून भलेभले लोक घायाळ झाले आहेत.

ऐश्वर्या रायसारखीच दिसणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिला सलमान खाननेच 'लकी' सिनेमातून लाँच केलं होतं. मात्र अन्य कोणालाच ऐश्वर्याची सर येऊ शकत नाही.

बिग बॉस १३ मधून प्रसिद्धीझोतात आलेली हिमांशी खुराना आठवतेय? पंजाबच्या हिमांशीने या शोमध्ये वाईल़्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.

आज हिमांशी ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त बिग बॉसमधला तिचा एक किस्सा पुन्हा चर्चेत आहे. 'वीकेंड का वार'च्या एपिसोडमध्ये सलमानने तिला विचारलेलं की, 'पंजाबचे लोक तुला काय नावाने ओळखतात?'

यावर हिमांशी म्हणालेली की तिला पंजाबची ऐश्वर्या राय म्हणतात. हे ऐकून सलमान 'वाह' म्हणतो. नंतर म्हणतो,"फक्त चेहरा सारखा असून काही होत नाही. ज्याप्रकारे ऐश्वर्या आणि कतरिनाने स्वत:ला फिट ठेवलंय तसंच राहावंही लागेल."

हिमांशी बिग बॉस १३ ची विजेती तर झाली नाही पण तिला या शोने प्रसिद्धी दिली. तिचे फॉलोअर्स वाढले. २०१२ मध्ये तिने 'जीत लेंगे जहां' सिनेमातून पदार्पण केलं. 'साड्डा हक' हा तिचा पंजाबी सिनेमा गाजला होता.

बिग बॉसमध्ये हिमांशी आणि असिम रियाज यांच्यात अफेअर सुरु झालं होतं. त्यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली. मात्र नंतर कुटुंबियांनी धर्माच्या कारणामुळे त्यांच्या नात्याला असहमती दर्शवल्याने त्यांचं नातं तुटलं.

















