ओटीटीसह थिएटरमध्ये रिलीज होणार 'हे' दमदार चित्रपट अन् सीरिज, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:33 IST2025-04-25T12:09:11+5:302025-04-25T12:33:38+5:30

मनोरंजनाचा महाधमाका... चला तर, आज काय काय धमाकेदार रिलीज होतंय, याच्या यादीवर एक नजर टाकूया...

शुक्रवारचा दिवस मनोरंजन विश्वासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण, याच दिवशी बहुतांश नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या आठवड्यातही शुक्रवार धमाकेदार मनोरंजनाचा वार ठरणार आहे. या आठवड्याच्या शुक्रवारी (Friday Movies And Series Release) म्हणजेच आज थिएटरसह ओटीटीवरही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

ज्वेल थीफ: बॉलिवूडचा छोटा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा अभिनय विश्वात धमाका करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा बहुप्रतीक्षित 'ज्वेल थीफ' (Jewel Thief - The Heist Begins) हा चित्रपट आज (२५ एप्रिल) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सैफसोबत या चित्रपटात, अभिनेता जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि अभिनेत्री निकिता दत्ता हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

ग्राउंड झिरो: या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याच्या 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) या चित्रपटाचा समावेश आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट आज जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात २००३मध्ये भारतीय सुरक्षा दलाने आतंकवादी गाजी बाबाचा खात्मा करण्यासाठी केलेले स्पेशल ऑपरेशन दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती.

फुले: अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) यांचा 'फुले' (Phule Movie) हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होता. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र, चित्रपटाविषयी काही वादंग निर्माण झाल्याने रिलीजची तारीख बदलून २५ एप्रिल करण्यात आली होती. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा चित्रपट आज रिलीज झाला आहे.

अंटील डाऊन: हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट 'अंटील डाऊन' (UNTIL DAWN) देखील प्रेक्षकांना आजपासून बघता येणार आहे. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. एला रॉबिन, पीटर स्ट्रोमेयर, माइया मिशेल आणि बेलमेट कॉमिली यांसारखे गाजलेले कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका सकारात आहेत.

बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपट 'देवमाणूस' (Devmanus) आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे सुद्धा आहेत.

झापुक झुपूक: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट २५ एप्रिल म्हणजेच आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी आहेत.

अंदाज अपना अपना: एकीकडे नवे चित्रपट रिलीज होत असतानाच, जुन्या चित्रपटांना री-रिलीज करण्याचा ट्रेंड देखील वाढत आहे. सलमान खान-आमिर खर यांचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' (Andaz Apna Apna) हा चित्रपट ३१ वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. २५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.