Flora Saini : “त्यानं माझ्या चेहऱ्यावर, प्रायव्हेट पार्टवर...”; 'स्त्री' फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:49 IST2023-02-01T13:36:55+5:302023-02-01T13:49:52+5:30

Flora Saini : होय, ज्या व्यक्तिवर तिने जीवापाड प्रेम केलं, त्यानेच १४ महिने तिचा प्रचंड छळ केला. तिला मारहाण केली...

स्त्री, गंदी बात फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने धक्कादायक खुलासा केला आहे. होय, ज्या व्यक्तिवर तिने जीवापाड प्रेम केलं,त्यानेच १४ महिने तिचा प्रचंड छळ केला. तिला मारहाण केली.

मी टू चळवळीदरम्यान फ्लोराने अनेक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या एक्स बॉयफ्रेन्डबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

फ्लोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आपबीती सांगितली आहे.

तिने सांगितलं, मी प्रेमात पडले होते. तो एक मोठा निर्माता होता. पण काहीच दिवसानंतर सगळं काही बदललं. तो माझा छळ करू लागला.

पुढे तिने सांगितलं, त्याने माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर मारहाण केली. त्याने माझा फोन हिसकावून घेतला. मी इंडस्ट्रीत काम करणं सोडावं यासाठी माझ्यावर दबाव आणला.

ती म्हणाली, १४ महिने मी प्रचंड शारीरिक, मानसिक छळ सहन केला. तो मला कुणाशीही बोलू द्यायचा नाही. एका रात्री मी हिंमत करून त्याच्या तावडीतून निसटले.

तिने सांगितलं, मी पुन्हा आपल्या आईवडिलांकडे गेले. पण सगळं काही विसरण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला अनेक महिने लागलेत

तिने सांगितलं,मोठ्या मुश्किलीने मी त्यातून बाहेर पडले. आज मी आनंदी आहे. आयुष्यात मला प्रेमही मिळालं आहे.

फ्लोरा ही मूळची चंदीगडची आहे. तिचे वडील आर्मी ऑफिसर होते. शालेय शिक्षणानंतर ती कुटुंबासोबत कोलकात्याला शिफ्ट झाली. यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केलं आणि तेलगू इंडस्ट्रीतून तिचा डेब्यू झाला.

फ्लोराने आतापर्यंत 'स्त्री', 'लव्ह इन नेपाल', 'दबंग टू', 'लक्ष्मी', 'धनक' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यासोबतच अनेक वेब सिरीजमध्ये देखील ती झळकली आहे.