ईद मुबारक! निक्की तांबोळीनं फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:10 IST2025-03-31T12:57:48+5:302025-03-31T13:10:33+5:30

Nikki Tamboli : अभिनेत्री निक्की तांबोळीने ईदच्या निमित्ताने केलेले खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाइलसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

निक्कीचा फॅशन सेन्स कोणापेक्षा कमी नाही आणि तिने फॅशनेबल अभिनेत्रींनाही मागे सोडले आहे.

निक्की तांबोळी बऱ्याचदा बोल्ड आउटफिटमध्ये पाहायला मिळते. मात्र यावेळी ती एथनिक ड्रेसमध्ये दिसते आहे.

निक्की तांबोळीने ईदच्या निमित्ताने खास फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे.

अनारकलीवर निक्कीने मोठे इअररिंग्स आणि हेअर झूमर घातले आहे.

या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

निक्की तांबोळीने फोटोशूट शेअर करत तिने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निक्की तांबोळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.