मराठमोळी अभिनेत्री सुलेखा तळवळकरच्या लेकीला पाहिलंत का?, आई इतकीच आहे खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 07:00 IST2022-06-03T07:00:00+5:302022-06-03T07:00:07+5:30

Sulekha Talwalkar: सुलेखा तळवलकरची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते.

मराठी छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुलेखा तळवळकरची मुलगी टिया आईसारखीच खूप सुंदर दिसते. नुकतेच सुलेखा यांनी लेकीचे फोटो शेअर करत स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

सुलेखा तळवळकर यांनी टियाचे फोटो शेअर करत लिहिले की, तू इतक्या वेगाने का वाढत आहेस? कालपर्यंत तू माझा हात तुझ्या बोटांनी धरून चालायला शिकली होतीस? तसेच तुझ्या शाळेच्या पहिल्या दिवसासाठी मी तुला सोडत होते. माझे लहान बाळ क्षणातच सुंदर स्त्री झाली आहे!

सुलेखाने पुढे म्हटले की,टिल्लू, तू एक गोड, दयाळू, सुंदर, शैक्षणिकदृष्ट्या हुशार मुलगी आहेस... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एक दयाळू आणि नम्र माणूस! प्रत्येक दिवसागणिक मला तुझा अधिक अभिमान वाटतो. फक्त लक्षात ठेव की मला नेहमीच तुमचे पाठबळ मिळते, काहीही असो.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे!

सुलेखा तळवळकरच्या या पोस्टला खूप पसंती मिळत आहे. या पोस्टवर सेलिब्रेटी कमेंट्स करत आहेत.

सुलेखाची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते.

सुलेखा यांची वेगळी ओळख करुन द्यायला नको. सुलेखा यांनी अंबर तळवलकरसह लग्न केले आहे. अंबर तळवलकर हा स्मिता तळवलकर यांच्या मुलगा आहे. सुलेखा दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत.

अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत. आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत.

टियाला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करण्याची आवड असून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला तिला आवडतात.

सुरेखा तळवलकर हिची मुलगी टिया ही तिच्या इतकीच सुंदर आहे. तसेच तळवलकर ग्रुप्सचे अनेक ठिकाणी असलेल्या फिटनेस सेंटर्सची जबाबदारी देखील ती सांभाळते.

तसेच आईसोबत वेगवेगळ्या रेसिपी यूट्यूब चॅनेलवर शेअर करताना दिसून येते.