टीव्हीवरील पार्वतीचा भलताच बोल्ड अवतार! बिकिनीतील फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "लग्नात रामसीता आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:48 IST2024-04-02T11:44:49+5:302024-04-02T11:48:37+5:30
'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीचा बिकिनीत बोल्ड अंदाज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'देवों के देव महादेव' ही टीव्हीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेत पार्वती माताची भूमिका साकारून अभिनेत्री सोनारिका भदौरिया घराघरात पोहोचली.
फेब्रुवारी महिन्यात सोनारिकाने उद्योगपती विकास पराशारबरोबर विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सध्या सोनारिका पतीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
सोनारिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.
आतादेखील तिने पतीबरोबरचे व्हॅकेशन ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
पण, या सगळ्या फोटोंमध्ये सोनारिकाच्या बीचवरील बिकिनीतील फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये सोनारिकाने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान करत फोटोसाठी पोझ दिल्याचं दिसत आहे.
टीव्हीवरील पार्वतीचा हा भलताच बोल्ड अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
"लग्नात रामसीता आणि बीचवर मिया खलिफा", "मालदीव्सला गेली म्हणून लोकेशन टाकलेलं नाही" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सोनारिकाने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'तुम देना साथ' मेरा, 'इश्क मे मरजावा', 'दास्तान ए मोहब्बत' अशा मालिकांमध्ये ती झळकली. याशिवाय 'हायपर', 'सासें', 'हिंदुत्व' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.