'चाची ४२०'मधील तबूची छोटी मुलगी आठवतेय का? इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने आणलं कॅमेऱ्यासमोर, आता दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:02 IST2025-12-30T13:58:25+5:302025-12-30T14:02:50+5:30

'चाची ४२०'मधील ही चिमुकली आता बरीच मोठी झाली आहे. सिनेमात ती तबूची मुलगी दाखवली होती. आता इतक्या वर्षांनंतर या मायलेकींचं रियुनियन झालं आहे.

'चाची ४२०' हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा. ११९७ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही तितकाच आवडीने पाहिला जातो.

या सिनेमाने कमल हसन, तबु, अमरिश पुरी, ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर भारती बनलेल्या छोट्या मुलीने तिच्या लाघवी अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

'चाची ४२०'मधील ही चिमुकली आता बरीच मोठी झाली आहे. सिनेमात ती तबूची मुलगी दाखवली होती. आता इतक्या वर्षांनंतर या मायलेकींचं रियुनियन झालं आहे.

तबू आणि तिची ऑनस्क्रीन लेक इक्कीस सिनेमाच्या प्रिमियरला एकत्र दिसल्या. यावेळी पापाराझींसमोर त्यांनी पोझही दिल्या.

"हिला ओळखलं का... हिची 'चाची ४२०'मध्ये माझी मुलगी होती", असं म्हणत तबूने पापाराझींनी तिची ओळख करून दिली.

'चाची ४२०'मध्ये छोट्या भारतीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आता बॉलिवूड स्टार आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री फातिमा शेख आहे.

फातिमाने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. 'चाची ४२०'मध्ये ती फक्त ४ वर्षांची होती.

तिने 'इश्क','वन टू का फोर','बडे दिलवाला' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे फातिमा प्रसिद्धीझोतात आली होती.

'सॅम बहादुर', 'आप जैसा कोई', 'मेट्रो इन दिनो', 'टेबल नं २१', 'मेरे मेहबूब मेरे सनम' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.