प्रियंका, दीपिका की कियारा... कोणी घातला लग्नात सर्वात महाग लेहेंगा?; किंमत ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:15 IST2023-02-15T15:02:07+5:302023-02-15T15:15:43+5:30
बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनी परिधान केलेल्या लेहेंग्याच्या किंमती ऐकून हैराण व्हाल.

अथिया शेट्टी ते कियारा अडवाणीपर्यंत अनेक बी-टाउन सुंदरींनी लग्न केलं आहे. सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे आणि मुली स्वत:साठी परफेक्ट लेहेंगा शोधत आहेत. अनेक नववधूंना बॉलिवूड अभिनेत्रींसारखाच लेहेंगा घालायचा आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या पोशाखांची किंमत जाणून घेऊया...
कियारा अडवाणीने नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. तिने तिच्या लग्नात डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला सुंदर फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. या लेहेंग्याची किंमत अद्याप समोर आलेली नाही, पण यात स्वरवॉसकी हिरे जडले होते, त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कियाराच्या या लेहेंगाची किंमत लाखोंमध्ये असणार आहे.
अथिया शेट्टीने देखील बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली. तिने लग्नासाठी अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा घातला होता, जो तयार करण्यासाठी खूप दिवस लागले. बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनी परिधान केलेल्या लेहेंग्याच्या किंमती ऐकून हैराण व्हाल.
2018 मध्ये दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत लग्न केलं. सेलिब्रिटी जोडप्याचे लग्न देशातील सर्वात लोकप्रिय लग्नांपैकी एक होते. तिच्या लग्नासाठी, अभिनेत्रीने सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला लाल लेहेंगा निवडला, ज्याची किंमत सुमारे 12 लाख आहे.
गेल्या वर्षी कतरिना कैफच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. तिने विकी कौशलसोबत शाही पद्धतीने लग्न केले. कतरिनाने देखील सब्यसाची मुखर्जीचीही निवड केली. तिने लग्नात वेलवेट एम्ब्रॉयडरी, जरदोजी बॉर्डर असलेला लेहेंगा घातला होता, ज्याची किंमत सुमारे 17 लाख असल्याचे सांगितले जाते.
अनुष्का शर्माने तिच्या लग्नात पेस्टल गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, तेव्हा नववधूंमध्ये त्याची मागणी वाढली होती. 2017 मध्ये अनुष्काने विराट कोहलीशी लग्न केले आणि तिने तिच्या लग्नात घातलेला लेहेंगा डिझायनर सब्यसाची मुखर्जीने 30 लाखांना डिझाइन केला होता.
जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये प्रियंका चोप्राचं निक जोनाससोबत शाही पद्धतीने लग्न झालं. प्रियंका चोप्राने परिधान केलेल्या सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या लाल लेहेंग्याची किंमत सुमारे 18 लाख आहे.
बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालने देखील 2020 मध्ये तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड गौतम किचलूला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले. यादरम्यान काजलच्या लेहेंग्याची खूप चर्चा झाली होती. तिने तिच्या लग्नात परिधान केलेल्या लेहेंग्याची किंमत सुमारे 5 लाख होती, जो तयार करण्यासाठी सुमारे 1 महिना लागला.
सोनम कपूरचा ब्रायडल लूकही चर्चेत होता. आनंद आहुजासोबतच्या लग्नात अभिनेत्रीने खूप महागडा लेहेंगा परिधान केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमच्या लेहेंग्याची किंमत 90 लाख रुपये होती.
आलिया भट्टने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तिचा ब्राइडल लूक युनिक आणि अतिशय सुंदर तर होताच, पण तो खूप महागही होता. आलियाच्या वधूच्या साडीबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिच्या लग्नात परिधान केलेल्या साडीची किंमत सुमारे 50 लाख आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)