हिंदी सिनेसृष्टीतील सालस, सोज्वळ नटी! अभिनयासह सौंदर्यानं चाहत्यांना लावलेलं वेड, कुठे गायब झाली 'विवाह'मधली पूनम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:05 IST2025-09-12T17:49:44+5:302025-09-12T18:05:53+5:30
बॉलिवूमधील सालस, सोज्वळ नटी! अभिनयासह सौंदर्यानं चाहत्यांना लावलेलं वेड, कुठे गायब झाली 'विवाह'मधली अमृता? लवकरच करतेय कमबॅक

'अब के बरस' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता राव.
बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून अमृताची ओळख आहे. आपल्या सुंदर अभिनयानं अमृतानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
'विवाह', 'मैं हूं ना', तसेच 'ईश्क विश्क', 'मस्ती' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयची दखल घ्यायला भाग पाडलं.
सध्या अमृता लाइमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये तिने आरजे अनमोलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सिनेविश्वापासून थोडी दुरावली.
आजकालच्या ऑन स्क्रीनच्या डिमांड्स पटत नसल्याने, तिने निवडक भूमिका करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
अमृता रावने २०१९ मध्ये आलेल्या 'ठाकरे' या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती.
लवकरच ही अभिनेत्री 'जॉली एलएलबी- ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.