'बॅड लक अ‍ॅक्ट्रेस' म्हणून हिणवलं; सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून 'ती' अभिनयाकडे वळली, आज बॉलिवूडवर गाजवतेय अधिराज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:31 IST2026-04-07T17:17:45+5:302026-04-07T17:31:52+5:30

सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडसह साउथही गाजवलं,नवरा आहे भारतीय खेळाडूंचा कोच

अनेक हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटातील दमदार अभिनयामुळे प्रसिध्दीच्या झोतात असणारी, ‘बेबी’, ‘पिंक’ आणि ‘मुल्क’ यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू.

अभिनेत्री तापसी पन्नूचा जन्म १ ऑगस्ट १९८७ रोजी दिल्लीतील एका सामान्य शीख कुटुंबात झाला. सध्या ही अभिनेत्री गांधारी या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बालपणापासूनच तापसी पन्नूला अभ्यासासोबतच खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यातही रस होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तापसीने गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर तिला एमबीए करायचे होते. पण, तिला तिच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्यास देखील सुरू केले. तापसीने जवळपास ६ महिने ही नोकरी केली.

एमबीए करण्याचा विचार करत असतांना तिला तेलगू चित्रपटाची ऑफर आली. २०१० मध्ये के.के. राघवेंद्र राव दिग्दर्शित झूमंडी नादम या तेलगू रोमँटिक-म्युझिकल चित्रपटातून तापसीच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. या चित्रपटात ती साऊथ स्टार धनुषसोबत होती. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

यानंतर तापसीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तामिळ, तेलगू, मल्याळम्‌ भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण दुर्दैवाने हे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत होते. त्यामुळे तिला बॅड लक एक्ट्रेस देखील म्हटले गेले.

तापसीने २०१३ मध्ये 'चश्मेबद्दूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, पण तापसीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

यानंतर एकामागोमाग आलेल्या सुपरहिट चित्रपटांनी पन्नूला यशोशिखरावर पोहचवले. यानंतर शार्पशूटर प्रकाशी तोमर यांच्यावरील बायोपिक सांड की आंख (२०१९) यातील प्रकाश तोमर या भूमिकेसाठी, तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

तापसीने व मॅथियस बो यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं. मॅथियस बो माजी बॅडमिंटनपटू आहे.डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने २०१५ मध्ये युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते.अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो २०२० मध्ये निवृत्त झाला. त्यानंतर त्याला भारतीय खेळाडूंच्या विनंतीवरून मॅथियासला भारतीय दुहेरी टीमचा कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं.