कॉमेडीच नव्हे, खलनायकही गाजला; 'शोले'मधील 'सुरमा भोपाळी'आठवतोय? लेकाने जपलाय अभिनयाचा वारसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:22 IST2025-09-16T16:08:08+5:302025-09-16T16:22:40+5:30
विनोदच नाहीतर खलनायकही गाजला,'शोले'मध्ये 'सुरमा भोपाळी' आठवतोय? लेकाने जपलाय अभिनयाचा वारसा

हिंदी चित्रपटसृष्टीत हास्यकलावंतांची परंपरा जरी मोठी असली तरी त्यातील काही कलावंत असे होते की, त्यांना प्रेक्षकांना हसविण्यासाठी वेगळा कोणताच प्रयत्न करावा लागत नसे. त्यांचं रुपेरी पडद्यावर येणंच प्रेक्षकांसाठी पर्वणी असायची.
याच नायकांच्या परंपरेतील एक नाव म्हणजे अभिनेते जगदीप.
आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या.
जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात २३ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा जन्म झाला.त्याचं खरं नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.
‘ब्रह्मचारी’, ‘अनमोल मोती’, ‘दो भाई’, ‘इश्क पर जोर नही’ सारख्या चित्रपटांतून त्यांच्या विनोदी भूमिका खूप चांगल्याच गाजल्या.
त्याचबरोबर रामसे ब्रदर्सच्या ‘पुराना मंदिर’, ‘एक मासूम’, ‘मंदिर मस्जिद’ या भयपटांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिकांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली..
केवळ अभिनयच नाहीतर या अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील तितकंच वादग्रस्त राहिलं. जगदीप यांनी ३ लग्न केली होती. तर, स्वतःपेक्षा ३३ वर्ष लहान जोडीदार निवडल्याने त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती.