शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रुबिनाच्या धाकट्या बहिणीने उरकला साखरपुडा; पाहा ज्योतिकाच्या engagement चे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 4:45 PM

1 / 7
बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. सध्या रुबिना तिच्या धाकट्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे.
2 / 7
रुबिनाची धाकटी बहीण ज्योतिका दिलैक हिच्याविषयी अनेकांना माहित असेल. रुबिना बिग बॉसच्या घरात असताना ज्योतिका या शोमध्ये आली होती.
3 / 7
ज्योतिका केवळ रुबिनाची धाकटी बहीण नसून प्रसिद्ध युट्यूबरदेखील आहे. त्यामुळे रुबिनाप्रमाणेच तिचा वेगळा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे अलिकडेच ज्योतिकाचा साखरपुडा झाला आहे.
4 / 7
ज्योतिकाचा प्रियकर रजत शर्मा याच्यासोबत साखरपुडा झाला असून या सोहळ्याचे काही फोटो ज्योतिका आणि रजतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 7
'जवळपास ९ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना भेटलो होतो. आणि, आज आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत. आकाशाकडे पाहिलं की असं वाटतंय संपूर्ण आकाश प्रेमाच्या रंगाने भरुन आलंय', असं कॅप्शन ज्योतिकाने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.
6 / 7
मागील ९ वर्षांपासून ज्योतिका आणि रजत एकमेकांना डेट करत आहेत.
7 / 7
ज्योतिका प्रसिद्ध युट्यूबर असून ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
टॅग्स :TV Celebritiesटिव्ही कलाकारTelevisionटेलिव्हिजन