लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:36 IST2026-04-07T11:27:39+5:302026-04-07T11:36:53+5:30

सूरजची पत्नी संजनाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे.

'बिग बॉस मराठी' फेम आणि रीलस्टार सूरज चव्हाणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सूरजची पत्नी संजनाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे.

संजनाच्या पत्नीने या फोटोंमध्ये बेबी शॉवरसारखा लूकही केल्याचं पाहायला मिळत आहे. साडी नेसून तिने फुलांची ज्वेलरी घातली आहे.

यातील एका फोटोमध्ये तिच्या साडीवर "आई" असं लिहिलेला ब्रॉचही लावल्याचं पाहायला मिळत आहे.

संजनाने फोटोंमध्ये बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. तिचे हे फोटो पाहून ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

संजनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सूरज-संजना आईबाबा होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र अद्याप सूरजने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय कोणती पोस्टही केलेली दिसत नाही.

सूरज आणि संजनाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न केलं. मोठ्या धुमधडाक्यात त्याचं लग्न पार पडलं होतं. आता लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.