सो हॉट! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लूक, समुद्रकिनारी केलं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:20 IST2025-09-16T14:10:09+5:302025-09-16T14:20:20+5:30
अभिनेत्रीचा किलर लूक, लोकप्रिय मालिकेत दिसली स्टायलिश भूमिकेत

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री तिच्या लूक्समुळे कायम चर्चेत असते. तिचा एकूणच फॅशन सेन्स घायाळ करणारा आहे.
वेस्टर्न आऊटफिट असो किंवा अगदी पारंपरिक साडीतील फोटो असो ती कायमच लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचा कायमच धुमाकूळ असतो.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने साकारलेले मायाचे पात्र चांगलेच गाजले होते.
ही अभिनेत्री आहे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). प्रिंटेड ब्लालेट टॉप, व्हाईट शॉर्ट्स या हॉट लूकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत.
मागे निळाशार समुद्र आणि किनाऱ्यावर ती उभी आहे. एकापेक्षा एक लक्षवेधी पोज तिने यामध्ये दिल्या आहेत. तिचा स्टायलिश लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
रुचिराच्या फिटनेसचं कौतुक तर करावं तितकं कमीच आहे. ब्रालेट टॉप आणि शॉर्ट्समध्ये तिने टोन्ड, स्लिम अँड ट्रिम फिगर फ्लॉन्ट केली आहे.
तसंच तिचं फोटोशूटचं लोकेशनही सुंदर आहे. किनाऱ्यावर बाजूला नारळाची झालं, आराम खुर्च्या अशी व्यवस्था आहे. या सगळ्यात ती निवांत क्षण अनुभवत आहे.
रुचिरा नुकतीच स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत दिसली. यामध्ये तिची लावण्या ही भूमिका होती. सध्या तिची मालिकेतली भूमिका संपली आहे मात्र तिचं कॅरेक्टर पुन्हा मालिकेत कमबॅक करणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.