'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीने दिले बोल्ड सीन्स, कोण आहे 'ही'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:39 IST2025-12-24T12:26:27+5:302025-12-24T12:39:48+5:30

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स, खऱ्या आयुष्यातही दिसते ग्लॅमरस

'मिसेस देशपांडे' सीरिजची सध्या चर्चा आहे. या सस्पेन्स थ्रिलर सीरिजमध्ये 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सीरियल किलरच्या भूमिकेत दिसत आहे.

सीरिजमध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने माधुरीच्या मुलाची तेजसची भूमिका केली आहे. तसंच तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

याशिवाय सिद्धार्थची पत्नी तन्वीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सिद्धार्थ आणि तिचे किसींग सीन्सही आहेत त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

ही अभिनेत्री आहे दीक्षा जुनेजा. सीरिजमध्ये ती माधुरीच्या सूनेच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थसोबत तिचा १ मिनीटचा बोल्ड सीन आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

दीक्षा अभिनयात येण्याआधी पत्रकार होती. 'सारे जहां से अच्छा' सीरिजमध्ये तिने नसीमा ही भूमिका साकारली होती ज्याचं कौतुक झालं होतं.

याशिवाय दीक्षाने 'पिल', 'युनायटेड कच्चे', 'अनबॅचलर्ड', 'गिल्टी माईंड्स', 'गर्लफ्रेंड चोर' अशा काही सीरिजमध्येही काम केलं आहे.

दीक्षा खऱ्या आयुष्यातही खूप स्टायलिश आहे. तिने बोल्ड, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

गेल्या महिन्यातच दीक्षाने फिल्ममेकर पार्थ आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. नवऱ्यासोबतचेही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.