पत्नीच्या कॅन्सरबाबत कळताच अशी झालेली आयुषमान खुराणाची अवस्था, म्हणाला- "मी हॉस्पिटलमध्ये खांबाच्या मागे बसून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:18 IST2025-04-08T12:43:20+5:302025-04-08T13:18:21+5:30
जेव्हा पहिल्यांदा ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा आयुषमान खुराणासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता.

आयुषमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. ताहिराने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
७ वर्षांपूर्वी २०१८ मध्ये ताहिराला कॅन्सर असल्याचं समजलं होतं. यावर उपचार घेत २०२०मध्ये ती यातून पूर्णपणे बरी झाली होती.
जेव्हा पहिल्यांदा ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा आयुषमान खुराणासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता.
"जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला ताहिराच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं तेव्हा आम्ही दिल्लीत होतो. आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हती".
"आम्ही हादरलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. आम्ही जिथे बसलो होतो तिथे लोकांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते.
"तिथे मी खांबाच्या मागे लपून बसलो होतो. सुरक्षारक्षकालाही हे पाहून भयावह वाटत होतं", असं आयुषमान खुराणाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
ताहिराच्या कॅन्सरमुक्त होण्याच्या प्रवासात आयुषमानने तिला पुरेपूर साथ दिली होती.
आता पुन्हा ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर उद्भवला आहे. पण, यातूनही मार्ग काढत त्यावर मात करणार असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
ताहिराच्या पोस्टवर कमेंट करत आयुषमानने "माझी हिरो" असं म्हणत तिला धीर आणि बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.