वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य
By देवेंद्र जाधव | Updated: July 7, 2025 17:08 IST2025-07-07T16:51:09+5:302025-07-07T17:08:56+5:30
४६ वर्षीय सोहा अली खानचं वजन गेल्या काही वर्षात अजिबात वाढलं नाही. ती आहे तशीच आहे. त्यामागचं रहस्य सोहाने सांगितलं आहे

सोहा अली खान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सोहा अली खान गेली अनेक वर्ष आहे तशीच फिट अँड फाईन दिसते. सोहाने तिचं फिटनेस सीक्रेट सांगितलं आहे
सोहा सकाळी उठल्यावर आधी मेथीचं पाणी पिते. याशिवाय नाश्त्याला ती एखादं सफरचंद आणि पपई खाते. याशिवाय ग्लूटन फ्री टोस्ट ती जाम किंवा चीज सोबत खाणं पसंत करते
सोहा खाण्या-पिण्याच्या बाबतीत तशी आळशी आहे. परंतु स्वतःला फिट ठेवण्यासाठी सोहा तिच्या आहारात एका पदार्थाचा आवर्जुन उल्लेख करते.
सोहा तिच्या आहारात बदामाचा समावेश करते. सोहाचं वजन ११० पाऊंड म्हणजे ४९ किलो आहे. त्यामुळे वजन नियंत्रित राखण्यासाठी सोहा आहारात एका बदामाचा समावेश करते
याशिवाय दुपारच्या जेवणात सोहा डाळ, भाजी आणि ब्राऊन राईस खाणं पसंत करते. त्यामुळे सोहाचं जेवण संतुलित राहतं. आणि इतकंच खाल्ल्याने तिला दिवसभर एनर्जी मिळते.
रात्रीच्या जेवणात डिनरमध्ये सोहा प्रोटीन मिळण्यासाठी चिकन किंवा माश्यांचा समावेश करतो. त्यामुळे सोहाला आवश्यक ते प्रोटीन मिळतं.
अशाप्रकारे ४६ वर्षांची असलेली सोहा फिटनेस फ्रीक असून ती योग्य आणि संतुलित आहार घेते. सोहाची सोपी आहारपद्धत अनेकांना फिट राहण्यासाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही