हे आहेत बॉलिवूडचे टॉप १० व्हिलन्स आणि त्यांचे मुलं, ज्यांच्याबाबत क्वचितच तुम्हाला माहीत असेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:53 IST2022-02-21T12:40:07+5:302022-02-21T12:53:36+5:30

Bollywood's Villain Son's : हे ते व्हिलन आहेत ज्यांची लोकप्रियता हिरोपेक्षा अजिबात कमी नाही. पण तुम्हाला त्यांच्या मुलांबाबत माहीत आहे का? या पडद्यावरील व्हिलन्सची काही मुलं फिल्मी दुनियेत काम करत आहेत. तर काही जास्त काळ टिकू शकले नाहीत.

सांभा असो वा शेट्टी, बख्तावर असो वा 'बॅड मॅन' ८०च्या दशकातील या व्हिलन्सना सगळेच ओळखतात. या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं बरीच वर्ष भरभरून मनोरंजन केलं. हे ते व्हिलन आहेत ज्यांची लोकप्रियता हिरोपेक्षा अजिबात कमी नाही. पण तुम्हाला त्यांच्या मुलांबाबत माहीत आहे का? या पडद्यावरील व्हिलन्सची काही मुलं फिल्मी दुनियेत काम करत आहेत. तर काही जास्त काळ टिकू शकले नाहीत.

एम. बी. शेट्टी आणि रोहित शेट्टी - शेट्टी नावाने फेमस एम बी शेट्टी तेव्हाचे प्रसिद्ध व्हिलन होते. ८०च्या दशकात त्यांनी अनेक सिनेमात व्हिलनचं काम केलं. इतकंच नाही तर ते स्टंट डिरेक्टरही होते. त्यांचा मुलगा रोहित शेट्टी आज बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

मैक मोहन आणि विक्रांत मेकीजन - मॅक मोहन यांनी साकारलेला सांभा हा व्हिलन अजरामर आहे. पण जेव्हा ते मुंबईत आले होते तेव्हा त्यांचं स्वप्न क्रिकेटर बनण्याचं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव मिनी आहे आणि त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विक्रांत हा अखेरचा ‘द लास्ट मार्बल’ नावाच्या सिनेमात दिसला होता.

दलीप ताहिल आणि ध्रुव ताहिल - दलीप ताहिल हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्हिलन्सपैकी एक आहेत. इश्क, बाजीगर, कयामत से कयामत तक, तलाश आणि सोल्जर सिनेमातील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत. त्यांचा मुलगा ध्रुव ताहिलही बॉलिवूडपासून दूर लंडनमध्ये अॅक्टिंग आणि मॉडलिंगच्या करिअरमध्ये सक्रिय आहे.

कबीर बेदी आणि अदम बेदी - कबीर बेदी हे त्यांच्या भूमिकांसोबतच त्यांच्या लव्ह लाइफबाबत जास्त चर्चेत असतात. त्यांनी अनेक सिनेमात जबरदस्त व्हिलन साकारले आहेत. त्यांचा मुलगा अदम बेदी एक इंटरनॅशनल मॉडल आहे.

अमजद ख़ान आणि शादाब ख़ान - 'गब्बर'ची भूमिका अजरामर करणारे अमजद खान आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा मुलगा शादाब खान याने बॉलिवूडमध्ये 'राजा की आएगी बारात'मधून डेब्यू केलं होतं. पण त्याला लोकांचं फार प्रेम मिळालं नाही. लवकरच तो सिने विश्वातून गायब झाला.

शक्ति कपूर आणि सिद्धांत कपूर - क्राइम मास्टर गोगो आणि बलमा नावाने लोकप्रिय असलेला शक्ती कपूर आजही तेवढाच लोकप्रिय आहे. त्याने ८०च्या दशकात एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. त्याचा मुलगा सिद्धांत कपूरही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. पण तो फार फेमस झाला नाही. तो हसीना पारकर मध्ये दिसला होता.

डॅनी डेंज़ोंग्पा आणि रिंज़िंग डेंज़ोंग्पा - डॅनीचं खरं नाव Tshering Phintso Denzongpa असं आहे. डॅनी हे नाव त्यांना जया बच्चन यांनी दिलं होतं. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी इंडस्ट्री सर्वात चांगल्या व्हिलनमध्ये जागा मिळवली. डॅनी यांचा मुलगा रिंज़िंग सिनेमात येण्याची तयारी करत आहे. तो लवकरच सिनेमात दिसेल.

सुरेश ओबेरॉय आणि विवेक ओबेरॉय - सुरेश ओबेरॉय हे त्यांच्या आवाजासाठी आणि अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांचा मुलगा विवेक ओबेरॉयने 'कंपनी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. हा सिनेमा हिट झाला होता. त्यानंतरही त्याने काही हिट सिनेमे दिले. पण नंतर त्याचं करिअर डळमळलं. आता विवेक मोजक्याच सिनेमात दिसतो. तो साऊथचे सिनेमेही करतो.

गुलशन ग्रोवर आणि संजय ग्रोवर - ४०० पेक्षा जास्त सिनेमात काम करणाऱ्या गुल्शन ग्रोवरने अनेक सिनेमात जबरदस्त व्हिलन साकारले आहेत. त्याची राम लखनमधील बॅड मॅनची भूमिका तर आजही लोकांच्या लक्षात आहे. पण त्यांचा मुलगा संजय Metro Goldwyn Mayer सोबत एका इंटरनॅशनल प्रोजेक्टवर असिस्ट करत आहे.

रज़ा मुराद आणि अली मुराद - आपल्या दमदार आवाजासाठी ओळखले जाणारे रजा मुराद हे सुद्धा बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय व्हिलनपैकी एक आहेत. त्यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा मुलगा अली लंडनमध्ये थिएटर शिकत आहे. तो लवकरच बॉलिवूड डेब्यू करू शकतो.