Shiv Jayanti 2026 Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिवजन्मोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:55 IST2026-02-18T16:37:56+5:302026-03-06T10:55:34+5:30

Shiv Jayanti Wishes in Marathi: सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून ज्यांच्या शौर्याचा आवाज आजही घुमतोय, त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव २०२६ मध्ये ही तिथी शुक्रवार, ६ मार्च रोजी येत आहे. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि हा सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास शुभेच्छा संदेश. चला तर मग, शिवरायांचे हे प्रेरणादायी विचार आणि स्टेटस शेअर करून साजरा करूया शिवजयंती २०२६.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून, जनतेकडे मायेने हात फिरवणारा, तो 'आपला शिवबा' होता! जय शिवराय! शिवजयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

सह्याद्रीच्या हृदयातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे! तुफान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा! सन्मान राखतो, जान झोकतो, या मातीचा राजा ! जय शिवराय! सार्‍या शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा जय शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.. मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

सूर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय! सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!