Rose Day 2026 Wishes: रोज डे निमित्त आपल्या जोडीदाराला पाठवा प्रेम व्यक्त करणारे Romantic Messages, Quotes आणि WhatsApp Status
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:49 IST2026-02-06T15:39:50+5:302026-02-06T15:49:59+5:30
Rose Day 2026 Wishes in Marathi: दरवर्षी 'व्हॅलेंटाईन सप्ताह' सुरु होतो तो 'रोज डे' ने. प्रेमाची सुरुवात गुलाबासारख्या नाजूक, सुगंधी, मनमोहक फूल देऊन केली जाते. प्रेमाचं, मैत्रीच, आत्मीयतेचं नातं उमलावं, बहरावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्या भावनांना शब्द देणारे हे शुभेच्छा संदेश.

Happy Rose Day Wishes in Marathi
आजचा दिवस खास आहे, कारण आज मला तुला सांगायचं आहे की, तू माझ्या आयुष्यातील टवटवीत गुलाब आहेस. Happy Rose Day!!

Happy Rose Day Messages in Marathi
मैत्रीच्या बागेतलं तुझं स्थान कायम राहो, आपल्या मैत्रीचा सुगंध नेहमी असाच दरवळत राहो. Happy Rose Day!!

Happy Rose Day Greeting in Marathi
नाही उमललं फूल तरीही सुवास येतो, भेट रोज नाही झाली तरी प्रत्येक क्षण तुझ्या विरहात जातो Happy Rose Day!!

Rose Day Quotes in Marathi
तुझ्या चेहऱ्याचं हसू या गुलाबापेक्षाही सुंदर आहे, ते असंच कायम राहू दे, प्रेमात मैत्री आणि मैत्रीत प्रेम वाढत राहू दे Happy Rose Day!!

Rose Day Marathi Wishes
आजचा दिवस सुगंधाचा, आजचा दिवस प्रेमाचा, सुरु झाला सप्ताह व्हॅलेंटाईन वीकच्या जल्लोषाचा! Happy Rose Day!!

Happy Rose Day Shubhechha
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू Happy Rose Day!!

लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…Happy Rose Day!!

















