अनारकली ड्रेसला मॉर्डन ट्विस्ट देऊन असे दिसा युनिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 17:41 IST2019-06-28T17:35:09+5:302019-06-28T17:41:45+5:30

पार्टी अथवा एखाद्या समारंभासाठी जास्तीतजास्त मुली अनारकली ड्रेसला पसंती देतात. अनारकलीमध्ये ट्रॅडीशनल आणि मॉर्डन लूक मिळतो. अनारकली ड्रेसला मॉर्डन ट्विस्ट देऊन युनिक लूक कसा करायचा हे जाणून घेऊया.
अनारकली ड्रेसची खरेदी करताना शिफॉन किंवा जॉर्जेटसारख्या सॉफ्ट आणि फ्री फ्लाईंग फॅब्रिकची निवड करा.
थोडासा हटके लूक करण्यासाठी अनारकली ड्रेससोबत लाँग जॅकेट म्हणजेच फ्लोर लेंथ जॅकेट घाला. सध्या ही स्टाईल लोकप्रिय आहे.
अनारकलीसोबत नेहमी लेगिन्स ट्राय करणं गरजेचं नाही तर प्लाजो पँट देखील वापरू शकता.
अनारकली ड्रेसची खरेदी करताना ट्रॅडीशनल डार्क कलर्सपेक्षा पेस्टल कलर्सचा वापर करा. सध्या पेस्टल कलर्सची फॅशन आहे.
अनारकली ड्रेससोबत हेवी ज्वेलरीचा वापर करू नका. नेहमी वेस्टर्न लूकवाली ज्वेलरी वापरा एक वेगळा फ्यूजन लूक मिळेल.
अनारकली ड्रेस हा सर्व वयोगटातील महिलांना सुंदर दिसतो. मात्र खरेदी करताना रंग आणि डिझाईनची उत्तम निवड करणं गरजेचं आहे.